Pune-Loanvala local : पुणे-लोणावळा लोकल खाली येवून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज चिंचवड रेल्वे स्थानकावर एका इसमाचा (Pune-Loanvala local) पुणे- लोणावळा लोकल खाली येवून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.6) सायंकाळी सात वाजता घडली आहे.

Talegaon Dabhade : शहरात नवरात्रोत्सव उत्साह भक्तिमय वातावरणात संपन्न

चिंचवड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे 38 वर्ष, अंगाने सडपातळ, रंग निमगोरा, अंगात पांढरा शर्ट,(Pune-Loanvala local) त्यावर पांढऱे पट्टे-बटणांची लाईन जांभळी, राखाडी रंगाची पॅन्ट, पायात काळे कंपनीचे बुट असे त्याचे वर्णन असून मयता संबंधी काही माहिती असेल तर नागरिकांनी चिंचवड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.