Talegaon Dabhade : शहरात नवरात्रोत्सव उत्साह भक्तिमय वातावरणात संपन्न

एमपीसी न्युज – साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक महत्वाचा सण म्हणजे विजयादशमी. हा सण तळेगाव शहरपरिसरात पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. रात्री उशिरा पर्यंत गरबा व दांडीयाने या उत्साहामध्ये चागंलीच रंगत वाढली होती. गेली दहा दिवस देवीची घट स्थापना हा धार्मिक विधी भाविकांनी भक्तिभावाने आणि उत्साहाने पार पाडला. नवरात्र उत्सवानिमित्त विविध मंडळाकडून गरबा आणि दांडीयाचे आयोजन केले होते. तरुणांनी या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला. रात्री उशिरा पर्यंत दांडीयाचे कार्यक्रम चालत होते.
शहरातील विविध भागातील मंदिरामध्ये नवरात्रौत्सवाचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दररोज महापूजा,भजन,प्रवचन विविध स्पर्धा खेळ पैठणीचा, होमहवन अशा कार्यक्रमाने शहरात धार्मिक  वातावरण निर्माण झाले होते.

दस-याचे दिवशी दाभाडे राज घराण्याचे परंपरेने शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात महापूजा सर सेनापती श्रीमंत सत्येन्द्रराजे दाभाडे  सरकार व याज्ञसेनीराजे यांचे हस्ते करण्यात आली.मंदिरातील विणा, मृदुंग,टाळ आदी भजन साहित्याची पुजा तसेच महाआरती त्यांचे हस्ते करण्यात आली.
दुपार नंतर घरोघरी बसविलेले घट पुरणपोळी बरोबरच गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून हलविण्यात आले. भाविकांनी नवरात्रौत्सवानिमित्त  केलेले उपवास सोडण्यात आले.सायंकाळी सार्वजनिक  ठिकाणी  बसविलेल्या देवीचे वाजत गाजत मिरवणूक काढुन विसर्जन करण्यात आले.
सायंकाळी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांची पालखीची ग्रामप्रदक्षिणा    काढण्यात आली होती. तर ग्रामस्थांनी घरोघरीजाऊन एकमेकांना आपट्याचे सोनं देऊन शुभेच्छा दिल्या. तर काही सार्वजनिक मंडळानी गरबा व दांडी याचे कार्यक्रम ठेवले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.