Hinjawadi : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुणाला वेटर आणि व्यवस्थापकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज – मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुणाला हॉटेलमधील वेटर आणि व्यवस्थापकाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) दुपारी दोनच्या सुमारास मान रोड, हिंजवडी येथे घडली.

तन्मय प्रेम प्रकाश शर्मा (वय 21, रा. हिंजवडी. मूळ रा. उंटवाडी, नाशिक) या तरुणाने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बालाजी जाधव, अविनाश सायना नारावड, दीपक (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी तन्मय त्याच्या मित्रांसोबत मान रोड हिंजवडी येथील लक्ष्मीविलास हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेला. जेवण झाल्यानंतर तो घराकडे निघत असताना हॉटेलमधील वेटरने त्याला ‘तुम्हाला एवढा वेळ लागतो का गाडी काढायला’ असे म्हणत त्याच्या सहकारी वेटर आणि व्यवस्थापकाला बोलावून तन्मय आणि त्याच्या मित्रांना हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये तन्मयचा चष्मा व मोबाईल फोन फुटला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.