Hinjawadi : घरकामासाठी सेविका देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – घर कामासाठी तसेच नातवाला सांभाळण्यासाठी सेविका पाहिजे असल्याने त्याबाबतची ऑनलाईन चौकशी केली. त्याद्वारे एका इसमाशी संपर्क साधला असता त्याने 26 हजार रुपये बँक खात्यावर भरण्यास सांगितले. पैसे घेऊन देखील संबंधित इसमाने सेविका न देता ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली. ही घटना बावधन येथे घडली.

भास्कर दौलतराव वसाने (वय 65, रा. बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नितीनसिंग (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भास्कर यांच्या नातवाला सांभाळण्यासाठी तसेच घर कामासाठी त्यांना एका सेविकेची गरज होती. त्याबाबत त्यांच्या मुलाने ऑनलाइन माहिती घेऊन रुद्र साई इंटरप्राईजेसच्या नितीनसिंग याच्याशी संपर्क केला. त्याने सुरुवातीला त्याच्या बँक खात्यावर 26 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार भास्कर यांनी नितीनसिंग याच्या बँक खात्यावर 26 हजार रुपये जमा केले. पैसे मिळून देखील आरोपी नितीनसिंग याने सेविका न देता भास्कर यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.