Hinjawadi News : महिलेला सह कर्मचाऱ्याकडून लग्नाचे आमिष,आर्थिक फसवणूक करत विनयभंग

एमपीसी न्यूज – लग्न किंवा प्रेमाच्या नाटकात केवळ अल्पवयीन किंवा अशिक्षीत महिला नाही तर उच्च शिक्षीत व नोकरी करणाऱ्या स्ववलंबी मुली देखील बळी पडत आहेत. हिंजवडी येथे जॉब करणाऱ्या (Hinjawadi News) महिलेला तिच्याच सहकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवले, विश्वासाचा गैरफायदा घेऊन आर्थिक फसवणूक केली तसेच सोशल मिडीयावर बदनामी करत विनयभंग केला आहे.

याप्रकरणी पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मुनिष शर्मा व शुभम शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा सारा प्रकार सप्टेंबर 2022 ते 19 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडली आहे.

 

Chakan News : चाकणमध्ये फुटपाथ वर प्लास्टिक कचऱ्याचा खच, नागरिक त्रस्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व मुनिष हे एका कंपनीत काम करतात. त्यातून त्यांची ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादन केले.,त्याने पुढे फिर्यादीचे क्रेडीट कार्ड वापरून 60 हजार रुपये खर्च केले.पुढे त्याने हाताने मारहाण करत पीडितेचा गळा दाबून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपीचा भाऊ शुभम याने पिडीतचे फोटो सोशल मीडियावर अश्लील मजकूर टाकत प्रसिद्ध केला. तसेच पीडितेला व तिच्या घरच्यांना जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.