Pimpri News : शास्तीकर माफीचा आदेश धूळफेक; घरे नियमितीकरण महत्वाचे – विजय पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामावरील (Pimpri News) शास्तीकर भरला म्हणजे घराचे नियमतिकरण होणार नसल्याने महाराष्ट्र शासनाच  शास्तीकर माफीचा आदेश म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप करत घरे नियमितीकरण महत्वाचे असल्याचे घर बचाव संघर्ष समितीचे विजय पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले, शासनाने शास्तीकर आकारणी रद्द केलेली नाही. त्यामुळे अवैध बांधकामे ही अनियमितच राहतील म्हणजेच काय,तर तुमच्या अनधिकृत घरांवर शासनाच्या कारवाईची टांगती तलवार जैसे थेच राहणार आहे. देय शास्ती कर माफ केल्यामुळे शासनाच्या तिजोरीत मात्र मिळकतरुपी रक्कम वाढणार यात शंका नाही.अश्या पद्धतीने आदेश काढणे म्हणजे शहरात राहणाऱ्या 2 लाख अनधिकृत घरातील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. अशा धूळफेक आदेशामुळे भविष्यात अवैध बांधकामांना शास्ती आकारण्याचा प्रशासनाचा अधिकार अबाधित म्हणजेच जैसे थेच राहतो.

खरच प्रशासनाला शास्ती कर शहरातून म्हणजेच लाखो लोकांच्या डोक्यावरून हटवायचा असेल म्हणजेच हद्द पार करायचा असेल तर महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 अन्वये अधिनियम 1949 मधील कलम 267 (अ) मध्ये कायदेशीर दुरुस्ती महत्वाची आहे.भविष्यातील शास्तीची टांगती तलवार जैसे थे न राहण्यासाठी घरे नियमितीकरण नोटिफिकेशन काढून लाखो रहिवाशी नागरिकांना खरा दिलासा देणे महत्वाचे आहे.

Hinjawadi News : महिलेला सह कर्मचाऱ्याकडून लग्नाचे आमिष,आर्थिक फसवणूक करत विनयभंग

 

अवैध बांधकामे वैध केल्यास शास्ती कायदा आपोआप (Pimpri News) हद्दपार होईल .आयुक्तांनी 22 फेब्रुवारी 2023 रोजी नगरविकास खात्याला स्थायी मिळकतकरात वाढ होण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार आदेश काढण्यात आलेला दिसून येतो. शासन निर्णय सूची क्रमांक 3 मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की अवैध बांधकाम शास्ती माफ झाली म्हणजे सदरचे बांधकाम नियमित झाले असे समजण्यात येणार नाही.

म्हणजेच काय की भविष्यात  तुमच्या घरावर असलेली अनधिकृत बांधकाम पडण्याच्या कारवाईची  टांगती तलवार ही जैसे थेच असणार आहे. गुंठेवारी कायदयानुसार ज्यांनी ज्यांनी फेब्रुवारी 22 मध्ये शासन मुदतीत अर्ज दाखल केले आहेत त्यांची घरे नियमित करण्याचा आदेश शासनाने त्वरित देणे आवश्यक ठरते. तसे केले नाही तर आजचा आदेश अनधिकृत घरांच्या रहिवासीयांच्या 40 वर्षांपासून जैसे थे असलेल्या “जखमेवर” मीठ चोळण्यासारखे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.