Hinjawadi : गुटखा विकणाऱ्या सात जणांना अटक

0

एमपीसी न्यूज – प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला आणि तंबाखूची विक्री करणाऱ्या सात जणांना हिंजवडी पोलिसांनी गुरुवारी (दि. 26) अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 हजार 640 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

शोभाराम प्रभुराम गुजर (वय 35, रा. म्हाळुंगे), जयराम मुनकाराम सिरवी (वय 42, रा. म्हाळुंगे), रतन टीकाराम मीना (वय 20, रा. म्हाळुंगे), राममनोहर श्रीराम गुप्ता (वय 39, रा. हिंजवडी), नवनीत पितांबर पवार (वय 42, रा. हिंजवडी), मंगीलाल सावराम देवारी (वय 24, रा. मुळशी), मुकेश दिनेश सोलंकी (वय 23, रा. माणगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अण्णा सुरक्षा अधिकारी संतोष शामराव सावंत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी म्हाळुंगे पाडळे, माणरोड माणगाव आणि हिंजवडी गावात काहीजण बेकायदेशीररित्या प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी परिसरातून सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करत पाच हजार 640 रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असा माल जप्त करत आरोपींना अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like