Hinjawadi Crime News : हिंजवडीतील स्पा सेंटरवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; पाच महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका

एमपीसी न्यूज – वाकड -हिंजवडी रोडवरील एका स्पा सेंटरवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी 32 हजार 535 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत वेश्या व्यवसाय करणाऱ्या 5 महिलांची सुटका केली.

वाकड-हिंजवडी रोडलगत Lonunge cafe Hub Roof Top या मॉलमधील पहिल्या मजल्यावर Avira Thai Spa या मसाज सेंटरमध्ये बनावट गि-हाईक पाठवून वेश्या व्यवसायाची खात्री करून सामाजिक सुरक्षा पथकाने तेथे छापा टाकला. त्यात पोलिसांनी अवैधरित्या वेश्याव्यवसाय करणा-या 5 महिलांची सूटका केली.

स्पा सेंटरची 31 वर्षीय महिला व्यवस्थापक आणि स्पा सेंटरचा मालक राहुल चव्हाण (वय 40) या दोघांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, भारतीय दंड विधान कलम 370 (3), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींकडून 24 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, 8 हजारांचा मोबाईल, 35 रुपयांचे इतर साहित्य असा एकूण 32 हजार 535 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.