BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : घरफोडी करून चोरट्यांनी पळवला दीड लाखांचा ऐवज

एमपीसी न्यूज – शॉपिंगसाठी बाहेर गेलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी घरातून 1 लाख 53 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 1 जून रोजी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली.

श्रीनिवास बंगारराजू लक्ष्मीनरसिंह राजू चिंथलपाटी (वय 44, रा. हिंजवडी फेज तीन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास 1 जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास शॉपिंगसाठी बाहेर गेले. दरम्यान, त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी किचनच्या स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश केला.

घरातून सुमारे 1 लाख 53 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. रात्री दहाच्या सुमारास श्रीनिवास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

.