Hinjawadi News : हात उसने घेतलेल्या पैशांवरून कामगारास मारहाण

एमपीसी न्यूज – हात उसने घेतलेल्या पैशांच्या कारणावरून दोघांनी मिळून एका कामगाराला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास बावधन बुद्रुक येथे घडली.

शरद धनाजी गवारे (वय 33, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शाम द्वारकानाथ शेळके (वय 25, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी), निखिल (वय 25, पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद गवारे हे पेंटिंगचे काम करतात. शरद यांनी आरोपींकडून पाच दिवसांपूर्वी चारशे रुपये हात उसने घेतले होते. त्या कारणावरून गुरुवारी रात्री आरोपींनी फिर्यादी यांना गाठले. आरोपी निखील याने शरद यांना पकडून आरोपी शाम याने डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.