Chakan News: कंपनीतील साहित्याची चोरी करणाऱ्या सुपरवायझरला अटक

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करणाऱ्या सुपरवायझरने कंपनीतील साहित्याची चोरी केली. या प्रकरणी सुपरवायझरला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 23) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास महाळुंगे येथील स्टार इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली.

रामकिशोर नामदेव घाटोळ (रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. या प्रकरणी विकास सर्जेराव मोरे (वय 33, रा. सांगवी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्टार इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नोकरी करतात. याच कंपनीत आरोपी रामकिशोर हा सुपरवायझर म्हणून काम करतो. आरोपी रामकिशोर याने कंपनी मधून 68 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरले. हा प्रकार उघडकीस आल्याने रामकिशोर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रामकिशोर याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.