Pune News : एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा; सापडलेले दागिने केले परत

एमपीसी न्यूज – पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. प्रवाशाचे एसटीत विसरलेले चांदीचे दागिने त्यांनी परत करून इमानदारीचे उदाहरण समोर ठेवले आहे. एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी  (Pune News) कोणत्याही लोभाला बळी न पडता एसटीत विसरलेले दागिने पुन्हा त्या प्रवासाच्या ताब्यात सोपवले आहेत. नागनाथ लामकमे आणि बालाजी मेळे अशी या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत.  

 

अधिक माहिती अशी की, गुलबर्गा ते स्वारगेट ही एसटी बस स्वारगेट स्थानकावर आली होती. सर्व प्रवासी उतरून गेल्यानंतर चालक आणि वाहक असलेल्या नागनाथ आणि बालाजी यांनी बस डेपोत लावत असताना बसची पाहणी केली. यावेळी त्यांना एका सीटवर एक पिशवी आढळली. या पिशवीत चांदीचे दागिने (Pune News) होते.

 

 

हे चांदीचे दागिने त्यांनी तत्काळ स्वारगेटचे बस स्थानक प्रमुख असलेल्या गोविंद जाधव यांच्याकडे नेऊन दिले. त्यानंतर बस स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांनी या दागिन्यांची चौकशी करत प्रवाशांची शहानिशा केली आणि ज्या प्रवाशाचे हे दागिने होते त्याला परत केले. प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल वाहक आणि चालकाचा (Pune News) देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.