Morwadi News: स्वच्छता दिनी नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्यातर्फे स्वच्छता दूतांचा सन्मान

एमपीसी न्यूज – महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आज 2 ऑक्टोबर सर्व देशात स्वच्छता दिन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये अहोरात्र काम करणाऱ्या स्वच्छता दूतांचा सन्मान केला.

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक बाबू नायर, सुजित आगरकर, अजित भालेराव, शिवदास हांडे उपस्थित होते.

कोरोना काळात आपण सर्वजण घरात होतो. मात्र हे स्वच्छतादूत दररोज स्वच्छतेचा ध्यास घेऊन साफसफाईचे काम करत होते.,अशा महिला बंधू-भगिनींचा सन्मान व्हायला हवा. त्यांच्यामुळेच शहराला स्वच्छतेचे विविध पुरस्कार मिळाले असल्याचे नगरसेविका गोरखे म्हणाल्या.

महापालिका सेवेत असलेल्या 100 स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यात आला. सदाशिव खाडे यांनीही आपले विचार मांडले. अमित गोरखे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.