Talegaon Dabhade : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली. विद्यार्थ्यांनी बेस्ट फ्रॉम वेस्ट उपक्रमाअंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून सुबक सजावटीच्या वस्तू बनविल्या.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे सचिव मिलिंद शेलार सर मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा, प्राथमिक विभाग प्रमुख धनश्री पाटील तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी याप्रसंगी शालेय परिसराची स्वच्छता केली विद्यार्थ्यांनी बेस्ट फ्रॉम वेस्ट उपक्रमाअंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून सुबक सजावटीच्या वस्तू बनवण्याचा आनंद घेतला.

स्वच्छता अभियान व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे या उपक्रमांचे संस्थेचे अध्यक्ष संतोष खांडगे शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे व सचिव मिलिंद शेलार सर यांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.