Talegaon Dabhade : धर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या सभासदांना 9 टक्के लाभांश जाहीर; पतसंस्थेला 55 लाख रुपयांचा नफा

एमपीसी न्यूज – धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेचे उदघाटन संस्थापक खंडु टकले यांच्या हस्ते करण्यात आले. पतसंस्थेने सभासदांसाठी 9 टक्के लाभांश जाहीर केला आहे. मागील आर्थिक वर्षात पतसंस्थेला 55 लाख 39 हजार रुपये इतका नफा झाला आहे. संस्थेला लेखापरीक्षण वर्ग ‘अ’ दर्जा मिळाला आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय शेटे होते. सन 2020 -21 या आर्थिक वर्षामध्ये पतसंस्थेकडे 13 कोटी 8 लाखाच्या ठेवी असुन, कर्जवाटप 10 कोटी 60 लाख आहे. पतसंस्थेस रु. 55 लाख 39 हजार नफा झाला असुन, सभासदांना 9 % लाभांश जाहिर केला आहे.

संस्थेला लेखापरीक्षण वर्ग “अ” दर्जा मिळाला आहे. या सभेमध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपापले विचार मांडले व पतसंस्थेच्या अद्यावत कामकाजाबाबत कौतुकही केले. पतसंस्थेच्या या सभेत दै. बचत प्रतिनिधी समाधान शिंदे, प्रविण वडनेरे, व शैलेश वहिले यांचा सर्वाधिक रक्कम जमा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सचिव विनोद टकले यांनी अहवाल वाचन केले.

संचालक जितेंद्र बोत्रे यांनी सर्वांचे स्वागत केले व खजिनदार संतोष परदेशी यांनी आभार मानले तसेच उपाध्यक्ष दत्तात्रय शिंदे व सर्व संचालक संजय शिंदे, दत्तात्रय पिंजण, ॲड. तुकाराम काटे, सुदेश गिरमे, जितेंद्र खळदे, किरण किल्लावाला, सुनिता शेंडे, कल्पना चव्हाण व इतर सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.  सभा यशस्वी करण्याकरिता कर्मचारी वर्ग यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.