Pimpri: पवनामाईत जाणारे सांडपाणी तत्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी सोमवारपासून ‘साखळी उपवास’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवनानदी सात दिवसात जलपर्णीमुक्त करावी. नदीत जाणारे सांडपाणी तत्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे पदाधिकारी नदी प्रेमींच्या बरोबर सोमवार (दि.9) पासून साखळी उपवास करणार आहेत.

साखळी उपवास या संकल्पनेत रोज एक नदीप्रेमी व्यक्ती नदीप्रती आत्मीयता आणि नदी प्रदूषणावर प्रशासनाची अनास्था, दुर्लक्ष आणि निष्क्रियता या विरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी 24 तासाचा निरंकार उपवास करणार आहेत.  24 तासाचा हा निरंकार उपवास पाणी पिऊन किंवा पाणी न पिता केला जाईल.

या उपोषणात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी  केल्यानंतर उपवासाच्या दिनांकाची माहिती देण्यात येणार आहे. उपवास आपल्या घरून, कार्यालयातून कोठूनही करू शकता. हा उपक्रम फेसबुक, व्हॉट्सअॅप, सोशल मिडीयाच्या माध्यमातून जास्तीस्त-जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि 12 वर्षा वरील मुले, मुली स्वेच्छने सहभागी होऊ शकतील, असे रोटरी क्लबने सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :-  [email protected] या मेल आयडीवर अथवा  सचिन खोले 98604 31357,  गणेश बोरा 8888870703,  सचिन काळभोर 8080614650 आणि  प्रदीप वाल्हेकर  9011036360 यांच्याशी या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.