Pimpri: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष जितेंद्र कुलकर्णी यांचा तडकाफडकी राजीनामा

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष जितेंद्र कुलकर्णी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.  महासंघाचे राज्याचे कार्याध्यक्ष निखील लातूरकर यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. संघटनेच्या अंतर्गत वादातून त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ  समाजाच्या व्यावसायिक आणि आर्थिक समृद्धीसाठी कार्य करत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील महासंघाचे मोठे काम आहे. संघाच्या शहराध्यक्षपदी जितेंद्र कुलकर्णी यांची डिसेंबर 2019 मध्ये निवड झाली होती. त्यांनी तीन महिने कामकाज केले.

जितेंद्र कुलकर्णी यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राज्याचे कार्याध्यक्ष निखील लातूरकर यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. कुलकर्णी यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण समजू शकले नाही.  संघटनेच्या अंतर्गत वादातून त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. तसेच आपण आदेश दिला तर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्याकडे राजीनामा सोपविण्याची तयारी असल्याचे कुलकर्णी यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.