Pune : राज्यातील बांधकाम व्यावसायिकांचे मुंबई येथे महत्वपूर्ण अधिवेशन

एमपीसी न्यूज – ‘क्रेडाई महाराष्ट्र’ या बांधकाम व्यावसायिकांच्या राज्य पातळीवरील शिखर संघटनेतर्फे राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांसाठी मुंबई येथे ६ व ७ जानेवारी रोजी दोन दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. विले-पार्ले मधील हॉटेल सहारा येथे हे अधिवेशन होणार आहे. राज्यातील क्रेडाईच्या तालुका आणि जिल्हास्तरीय ५७ शाखांमधून सुमारे ७०० बांधकाम व्यावसायिकांनी या अधिवेशनासाठी नोंदणी केलेली आहे.

देश व राज्य पातळीवरील आव्हानात्मक परिस्थितीमुळे गृहबांधणी क्षेत्रासाठी भविष्यकालीन उपाययोजना आखणीसाठी हे अधिवेशन अत्यंत मोलाचे आहे, असे मानले जाते. “महाकॉन-२०२०” हा क्रेडाई महाराष्ट्राचा सलग ७ वर्षे सुरु असलेला हा उपक्रम, सभासदांना अत्याधुनिक बांधकाम प्रणाली, अद्ययावत कायदे, कर रचना, ग्राहक हीत, आर्थिक शिस्त, व्यावसायिक बांधिलकी या व इतर अनेक विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन देणारे व्यासपीठ उपलब्ध करतो.

_MPC_DIR_MPU_II

“रायझिंग अबोव्ह”, “RISING ABOVE”  असे ब्रीद वाक्य घेऊन संपन्न होणाऱ्या महाकॉन-२०२० चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. युवानेते कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, ऋतुराज पाटील उपस्थित राहणार आहेत.

क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट सतीश मगर, चेअरमन अक्षय शहा, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, भारतीय अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला, पूज्य गुरु ग्यानवत्सल स्वामीजी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्हाईस प्रेसिडेंट रचना भुसारी आदी वक्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे नगरविकास अतिरिक्त मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर हे नवीन बांधकाम नियमावली विषयी तर महारेरा चेअरमन गौतम चटर्जी हे रेरा विषयी सर्वांना संबोधित करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.