Nigdi : मेल आयडी हॅक करून पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मेल आयडी हॅक करून तसेच सर्जरीचे कारण सांगून अज्ञात इसमाने पाच लाखांची फसवणूक केली.

अजित जनक कालिया (वय 47, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 20 डिसेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी यांचा मेल आयडी अज्ञात आरोपीने हॅक केला. त्यांना सर्जरीचे कारण सांगितले आणि फिर्यादी यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.