Maval Corona Update : मावळमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.13 टक्के

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.23) 37 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.13 टक्के आहे तर मृत्यू दर 1.16 टक्के आहे.

मावळमध्ये आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 501 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 488 आहे.

शहरी भागात 18 तर ग्रामीण भागात 19 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 7 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 11 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही.

मावळ तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,555 झाली आहे. तर दिवसभरात 48  रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात टाकवे बुद्रुक 5, कामशेत 3, बऊर 2, देवले 2, करूंज, बेडसे, ब्राम्हणोली, कान्हे, चिखलसे, चांदखेड व मोहितेवाडी प्रत्येकी 1 असे एकूण 19  रुग्ण सापडले.

मावळ तालुक्यात आतापर्यंत 24,566 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 501  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8097, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4290 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1284 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13,671 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,884 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 143  लोणावळा नगरपरिषदमध्ये 92 वडगाव नगरपंचायतमध्ये 15 व ग्रामीण भागात 238 असे एकूण 488  रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.