Moshi : मराठी माणसाचा व्यवसायात वाढणारा टक्का अभिनास्पद – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – मोशी–आळंदीच्या आजूबाजूचा परिसर सध्या झपाट्याने बदलत आहे. या भागात व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत अाहे. या भागात वाढणारी नागरीवस्ती व्यवसाय करण्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. त्यात मराठी माणसाचा  व्यवसायात वाढणारा टक्का हा अभिनास्पद आहे, असे प्रतिपादन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले.

यावेळी आमदार महेश लांडगे तसेच अभिनेता नितेश चव्हाण, अभिनेत्री शिवानी बावकर (अजिंक्य आणि शीतल– ‘लागीर झालंजी फेम’) यांच्या हस्ते ‘मोशीग्रांड’ या मोशी–देहू रस्त्यावर उभारलेल्या हॉटेलचे उद्घाटन केले. यावेळी या हॉटेलचे मालक संतोष बारणे, गणेश जाधव, गणेश कुटे त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महेश लांडगे म्हणाले, मोशी–आळंदी रोडच्या आजूबाजूचा परिसराचा सध्या झपाट्याने कायापालट होत आहे. या भागात व्यवसायासाठी सध्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असून या भागात वाढणारी नागरीवस्ती व्यवसाय करण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आली आहे. त्यात या भागात मराठी माणसाचा व्यवसायात वाढणारा टक्का हा अभिनास्पद आहे. मराठी माणूस सध्या या ठिकाणी विविध व्यवसाय करताना दिसत आहे. हॉटेल या क्षेत्रात ठराविकच वर्गाचा सहभाग आहे. मात्र, या क्षेत्रात देखील मराठी माणसाचा वाढणारा सहभाग मराठी माणसाला आणि व्यवसायाला नवसंजीवनी देणारा आहे.

यावेळी या ‘मोशीग्रांड’ या हॉटेलचे मालक संतोष बारणे, गणेश जाधव, गणेश कुटे यांनी त्याचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की ग्राहकांना सर्वोतम सेवा देण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील. तसेच या भागातील खवय्येगिरी ग्राहकांसाठी ‘मोशी ग्रांड’ चांगला पर्याय आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.