Indapur Crime News :  चिंकारा हरणाची शिकार करण्यापूर्वीच शिकारी जाळ्यात

एमपीएन्यूज  :  चिंकारा जातीच्या हरणाला त्याने पकडले… त्याचे पाय बांधून घरात आणूनही ठेवले…  मटण करून खाण्याचा बेतही ठरला… पण त्याची कत्तल करण्यापूर्वीच शिकाऱ्याला  पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात असलेल्या सरस्वती नगर येथे  ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका 33 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली. 

आरोपीने 31 ऑक्टोबरच्या रात्री गोखळी वडापुरी गावच्या हद्दीत चिंकारा जातीच्या हरणाला पकडले. या हरणाला त्याने सरस्वती नगर येथील आपल्या घरात आणून ठेवले.

दरम्यान, तो या हरणाला कापण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला.

पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्यांना घराच्या एका कोपऱ्यात पाय बांधलेल्या अवस्थेत हरीण निपचित पडलेले आढळले.पोलिसांनी या हरणाची सुटका करीत आरोपीला ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.