India News – ‘रिअल मी 11 प्रो’ आणि ‘रिअल मी 11 प्रो+’ याचे नव्या वैशिष्ट्यांसह भारतात अनावरण

एमपीसी न्यूज – रिअल मी मोबाईल फोनची प्रो मालीका (India News) ही प्रो व प्रो+ मॉडेलसह उत्कृष्ट गुणवत्ता असलेले कॅमेरा, आकर्षक डिझाइन, शक्तिशाली प्रोसेसर, भरपूर स्टोरेज आणि प्रभावी डिस्प्लेसह भारतामध्ये अनावरण करत आहेत. या वैशिष्ट्यांसह रिअल मी कंपनीने परत भारतीय मोबाईल बाजारामध्ये स्वतःचे दमदार पदार्पण केले आहे. चीनमध्ये तयार झालेले हे मॉडेल फक्त आकर्षक आणि शक्तिशाली नसून चांगली बॅटरी सुद्धा देत आहेत.

दोन्ही पण मॉडेल्स हे 6.7 इंच स्क्रीन बरोबर येतात व दोन्ही ह्याच्यात आपण 1080 X 2412 पिक्सेल असणारे चांगल्या गुणवत्तेचे व्हिडिओ पण आपण या मोबाईल फोनमध्ये सहजपणे बघू शकतो. मोबाईल फोनमध्ये ऑक्ट-कोअर 6 एनएम मीडियाटेक डिमेन्सिटी 7050 चे प्रोसेसर व माली जी-68 चा जीपीयू असल्याने व्हिडिओ गेमिंगचा अनुभव हा अधिक चांगला वाटेल आहे. 12 जीबीच्या रॅम सोबत हे फोने 512 जीबीची इंटर्नल स्टोरेज देत आहेत व याने मोबाईल फोन ग्राहक हे बरेच आनंदी होत आहेत.

Kishor Aware : ….’हीच’ खरी किशोरभाऊंना श्रद्धांजली ठरेल! 

फोनची किंमत ही  मधल्या श्रेणीत असणार आहे. फोनची किंमत ही व्हेरिएन्टप्रमाणे बदलेल व साधारण 24000 रुपये ते 30000 रुपयांपर्यंत या दोन्ही फोनची किंमत असेल. 15  जून पासून हे मोबाईल विक्रीसाठी चालू होणार आहेत व डिस्काउंट साठी लवकर नोंदणी हि 8 जून पासून सुरु झाली आहे. हा मोबाईल आपण ऑनलाईन किंवा बाजारात जाऊन खरेदी करू शकतो आणि दोन्ही कडे ईएमआय सेवा उपलध (India News)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.