Kishor Aware : ….’हीच’ खरी किशोरभाऊंना श्रद्धांजली ठरेल! 

एमपीसी न्यूज (प्रदीप नाईक,माहिती अधिकार कार्यकर्ता )-

काळाचा महिमा काळच जाणे, 
कठीण तुझे अचानक जाणे, 
आजही घुमतो स्वर तुझा कानी, 
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी… 

भावपूर्ण श्रद्धांजली

किशोर भाऊ आवारे यांना म्हणजेच आपल्या भाऊला जाऊन एक महिना (Kishor Aware) पूर्ण होत आहे. आज भाऊ आपल्यात नाही हे खरंच वाटत नाहीये.

Pune : आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावर दिलेल्या धमकीचे प्रकरण गंभीर-अजित पवार

आज भाऊच्या विश्वासावर अनेक कुटुंब चालत होती. अनेक कुटुंबाचा उदारनिर्वाह चालत होता. भाजी मंडई असेल किंवा छोटे व्यवसायिक असतील आज भाऊ नसल्यामुळे भाजी मंडईतील लोक असतील किंवा छोटे व्यवसायिक असतील त्यांची हळहळ होत आहे की भाऊला न्याय कधी मिळणार? मावळातील गुन्हेगारीला आळा कधी बसणार?

भाऊचे टोलनाक्याचे आंदोलन असेल किंवा अनेक गोरगरीब जनतेसाठी भाऊने आंदोलन केले. तळेगाव नगरपालिकेमधील सुद्धा कचऱ्याचा प्रश्न असो किंवा तेथील कामगारांचे प्रश्न असो, भाऊने भ्रष्टाचार उघडीस आणला ही भाऊची चूक होती का?

2010 साली माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी  यांची सुद्धा अशीच हत्या झाली होती. तुम्ही विचारांची लढाई चालू ठेवा पण माणसे मारून काय भेटणार आहे समाजाला? आज भाऊमुळे समाजाला एक दिशा भेटत चालली होती. भाऊ समाजाला चांगल्या मार्गाला घेऊन चालला होता. पण त्याच समाजातील काही समाजकंटकांना हे बघवले नाही.

समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचे साध्य करायचे होते का? ते तर कदापि होणार नाही आमचे महाराष्ट्र पोलीस सदैव महाराष्ट्रातील जनतेबरोबर आहे व ते कायमस्वरूपी राहणार.

भाऊ तू आमच्यातून शरीराने गेलेला आहे, पण तुझे विचार तू आमच्यात रुजवलेले आहेत. तुझे विचार घेऊन आम्ही पुढे काम चालू ठेवणार आहोत. समाजाला योग्य दिशा व समाजातील भ्रष्टाचार आम्ही तुझ्या विचाराच्या माध्यमातून कमी करणार आहोत.

भ्रष्टाचाराला कुठेही आम्ही स्थान भेटू देणार नाही तसेच सोमाटण्यातून नाक्याचे जे काम आहे भाऊ तुझे ते आम्ही जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तसेच तुझे काही जवळचे विश्वासू कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्ही हे काम चालू ठेवणार आहोत. भाऊ तुला लवकरात लवकर न्याय मिळालाच पाहिजे, हीच तुला खरी श्रद्धांजली !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.