Talegaon : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर गोळीबार आणि वार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 12) दुपारी घडली. किशोर आवारे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे शुक्रवारी दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी गेले होते. मुख्याधिकाऱ्यांना भेटून ते इमारतीच्या खाली आले. (Talegaon) नगरपरिषदेच्या समोर येताच चार जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आवारे यांच्यावर गोळीबार तसेच कोयत्याने वार करण्यात आले. यात आवारे यांना दोन गोळ्या लागल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Alandi : आळंदीत आढळला अनोळखी मृतदेह

 

किशोर आवारे यांना तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांसह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.