Chinchwad : चिंचवडमध्ये रंगणार नव्वदच्या दशकातील सदाबहार गीतांची मैफल

एमपीसी न्यूज – आलाप एंटरटेनमेंट आणि स्मिताज दि पुणेरी ग्रुव्हस आयोजित  नव्वदच्या दशकातील सदाबहार गीतांची मैफल चिंचवड मधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक चांगले गायक गीतांचे सादरीकरण करणार आहेत.(Chinchwad) शनिवारी (दि. 20 मे) रोजी रात्री साडेनऊ वाजता ही मैफल होणार आहे. ‘एमपीसी न्यूज’ या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत.

नव्वदच्या दशकातील गाणी ऑल टाईम हिट अशीच आहेत. मातब्बर गायकांनी हे दशक चांगलेच गाजवत प्रेक्षकांना आपल्या गाण्यांनी भुरळ पाडली. तोच धागा पकडून ’90 का नशा’ नावाचा सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रशांत साळवी आणि स्मिता बोकील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेतला जात आहे.

Chinchwad : चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक निलकंठ चिंचवडे यांचे निधन

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त डॉ. जोहर चुनावाला यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमात सीमा बन्सल, प्रणिता बनसोडे, अभिजित बोकील, प्रज्ञा चोपडे, (Chinchwad) केदार वळसंगकर, निलेश तोडमल, कल्याणी कुलकर्णी, राहुल कोसंधर, वृंदा वळसंगकर, शाम सिसोदे, शिवानी सावंत हे गायक गीते सादर करणार आहेत. चांगल्या गायकांसाठी हे हक्काचं व्यासपीठ असणार आहे. प्राजक्ता श्रावणे सूत्रसंचालन करणार आहेत.

चिंतन मोढा, अमन सय्यद, तन्मय पवार, लिजेश शशिधरण, अभिजित भडे, केदार मोरे, सोमनाथ फाटके, विशाल गंद्रतवार, आयुष शेखर हे संगीतासाठी साथ देतील. साउंड राजरत्न पवार करतील.

अधिक माहितीसाठी संपर्क – 9922420829/ 7261938338
बुक माय शो वरून तिकीट बुक करण्यासाठी – https://in.bookmyshow.com/events/90s-ka-nasha-a-nostalgic-musical-journey/ET00359163
रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 13 मे /2023 पासून तिकीट विक्री सुरु आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.