Pune : स्वाती गायकवाड ठरली सुपरग्लोबल इंटरनॅशनल मिस इंडियाची मानकरी

एमपीसी न्यूज : यंदाचा सुपरग्लोबल इंटरनॅशनल मिस इंडियाचा किताब पुण्यातील (Pune) स्वाती गायकवाड हीने पटकवला. फ्लेम फायर मीडिया प्रोडक्शनच्या वतीने गोवा येथील साईराज बीच रिसॉर्टमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. स्वाती गायकवाड ही  पुण्यामध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करतात.

या स्पर्धेत पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर, नोएडा, कोलकाता, केरळ, आसामसह दुबई, रशिया, कुवेत, इंडोनेशिया, अमेरिकामधील मॉडेल सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेच्या ज्युरी म्हणून पूनम राऊत, झाहीरा शेख, वर्षा असालकर यांनी काम पाहिले.

Chinchwad : चिंचवडमध्ये रंगणार नव्वदच्या दशकातील सदाबहार गीतांची मैफिल

मिस, मिसेस आणि किशोर अशा तीन गटात हि स्पर्धा पार पडली. सुरजया मोनी डोलोई या कार्यक्रमाचे आयोजक होते. मूळच्या मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे स्वातीचे बालपण गेले. लहानपणापासूनच स्वाती यांना मॉडेलींग आणि फॅशन इंडस्ट्रीविषयी आकर्षण होते . त्यांच्या या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आई मोहिनी गायकवाड यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. भविष्यात जागतिक स्पर्धेत भारताला प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असल्याचे स्वातीने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.