Bhosari : बीआरटी चालक व वाहकाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – बसमध्ये बसलेल्या (Bhosari) व्यक्तीने पीएमपीएमएल बस चालकाला व वाहकाला शिवीगाळ व मारहाण केली आहे. हा प्रकार भोसरी बीआरटीएस बस स्टॅन्डवर गुरुवारी (दि.7) घडली.

याप्रकऱणी प्रमोद सुरेश खारवे (वय 44 रा.आकुर्डी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून प्रशांत सुरेश खारवे (वय 44 रा.आकुर्डी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

India News – ‘रिअल मी 11 प्रो’ आणि ‘रिअल मी 11 प्रो+’ याचे नव्या वैशिष्ट्यांसह भारतात अनावरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीएमपीएमलमध्ये (Bhosari) चालक आहेत. ते त्यांच्या सहकाऱ्यासह जेवणासाठी गेले. जेवून परत आले असता पार्क केलेल्या बसमध्ये आरोपी बसला होता. यावेळी फिर्यादी यांना विनाकारण शिवीगाळ केली व हाताने मारहाण केली. यावरून भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.