Women’s day : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन (Women’s day) फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मा.नगरसेविका निर्मला कुटे,समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, शिवसेना उपनेत्या  अनिता तुतारे, विठाबाई चाबुकस्वार, मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका  वैशाली चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई जगताप, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार  प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

Budget 2023 : राज्य सरकारचे महिलांना मोठे गिफ्ट, एसटी प्रवासासाठी तिकिट दरात सरसकट 50 टक्के सूट

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आमच्या संस्थेतर्फे गेली दहा ते बारा वर्षांपासून महिलांची जनजागृती, सक्षमीकरण तसेच समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करीत आहेत (Women’s day) त्याद्वारे ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ म्हणून समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला जेष्ठ नागरिक श्रीमती आनंदीबाई भालेराव, सुमित्रा पानखेडे, डॉ. संगीताताई लोखंडे, डॉ. कविताताई मेसकर, ऍड. सीमा शर्मा, ऍड. शुभांगी भालेराव, . वैशाली जगताप,  असावरी घोडके मॅडम  यांचा संविधान प्रतिमा व गुलाब पुष्प प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

मा.शारदाताई मुंडे एकपात्री “क्रांतीज्योती मी सावित्री बोलते” सावित्रीबाईंच्या जीवनावर समाज प्रबोधन केले. निशा पवार मॅडम यांनी आपल्या भाषणातून मातृत्व हे परमेश्वराने स्त्रीला दिलेले एक अतुलनीय वरदान आहे. एखादी स्त्री आई झाली तर तिची जबाबदारी निश्चितच वाढते. एक म्हणजे घरचे काम व बाळाचे संगोपन अशी दुहेरी जबाबदारी नोकरदार स्त्रियांसाठी नोकरी, घरचे काम वबाळाचे संगोपन अशी तिहेरी जबाबदारी. त्यामुळे ती स्वतःसाठी वेळी देऊ शकत नाही.

“ज्या घरात मुली असतात ते घर सुख, समृद्धी व भरभराटीच्या मार्गावर असते. घरात प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी जपण्याचे काम कन्या ही लिल्या पार पडते (Women’s day) असे म्हणतात ना, ‘सुख, समृद्धीची पेटी म्हणजे बेटी’,असे सांगितले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सचिन कळसाईत सर व आभार उर्मिला ठोंबरे  मॅडम यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.