Pune News : अनधिकृत बांधकामांची तसेच बेकायदा प्लॉटिंगच्या दस्त नोंदणीची तपासणी सुरु

एमपीसी न्यूज : काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका दुय्यम निबंधक कार्यालयात नियमबाह्य जमिनींची तसेच सदनिकांची दस्तनोंदणी झाल्याचं उघड झालं होतं. याप्रकरणी संबंधित दुय्यम निबंधकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

पण हे प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून पुणे शहरात विविध ठिकाणी हजारो दस्तऐवज नियमबाह्य पद्धतीने नोंदणी केल्याचं उघड झालं आहे. पुणे शहरातील काही कार्यालयांमध्ये 250 हूनही अधिक प्रकरणांत अशाप्रकारे नियमबाह्य नोंदणी केल्याचं दिसून आलं आहे. शहारात हजारो दस्तांची नियमबाह्य पद्धतीने झाल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

या तपासणीचे काम पूर्ण झाले असून यामध्ये काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नियमबाह्यपणे दस्तांची नोंदणी झाल्याचे उघड झाले आहे. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला असल्याची माहिती नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बेकायदेशीरपणे दस्तांच्या नोंदणी केल्याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

शहरातील एका दुय्यम निबंधक कार्यालयात नियमबाह्यपणे जमिनींची तसेच सदनिकांची दस्त नोंदणी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी संबधित दुय्यम निबंधकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची तक्रार मंत्रालयापर्यंत पोहोचल्यावर महसुल विभागाने शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील मागील तीन वर्षातील दस्तांची तपासणी करण्याचे आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.