Pune : शहर भाजपच्या अध्यक्षपदी जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज – पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी जगदीश मुळीक यांची निवड झाल्याचे निवडणूक प्रक्रिया निरीक्षक बाळा भेगडे यांनी आज बुधवारी जाहीर केले. आमदार सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष, माजी आमदार योगेश टिळेकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला मेंगडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष, नगरसेवक दीपक पोटे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे शहर भाजपचे माजी अध्यक्ष योगेश गोगावले यांनीही मुळीक यांच्या नावाला अनुमोदन दिले.

भारतीय जनता पार्टी, पुणे शहर संघटन पर्व कार्यकर्ता मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेता धीरज घाटे उपस्थित होते.

_PDL_ART_BTF

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचाच महापौर होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी जगदीश मुळीक संधीचे सोने करणार असल्याचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.

शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादी, बसपा, सपा कोणाची तुम्हाला माहिती आहे. भाजप हाच स्वतःच्या मालकीचा पक्ष असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

पुणे शहराध्यक्ष म्हणून माझी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. शिवसेना एका घराण्याची, काँगेस नेहरू – गांधी यांची, भाजप ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. ही देशातील नवे तर जगातील मोठी पार्टी आहे. काँगेस सरकार सत्तेत असतांना 1 – 1 घोटाळा बाहेर यायचा, आपले केंद्रात सरकार आल्यानंतर एकही घोटाळा समोर आला नाही. आपल्याला भाजपची ताकद वाढवायची. महापालिकेत पुन्हा सत्ता आणायची. सर्वच घटकांसाठी काम करायचे.

– जगदीश मुळीक

राज्यातील हे अपघाती सरकार, महापालिका निवडणुकीत वॉर्ड वॉर्ड करणार, कोणीही कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, शिवभोजन ही फसवी योजना आहे. 100 थाळ्या देतात, 400 लोक उपस्थित असतात, मुळीक तुमच्या बरोबर नाना, दादा, भाऊ आहे. सिंगल, डबल किंवा चारचा प्रभाग असो, 95 ते 97 नगरसेवक आपण आजही निवडून आणू शकतो. 2022 मध्येही भाजपचाच झेंडा फडकेल.
– राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.