Janasanavd Sabha : सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Janasanavd Sabha) वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या (सोमवारी) सकाळी 10 ते 12 यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

Dr. Prabha Atre : जे जे आवडे ते ते पारखूनी घ्यावे; डॉ. प्रभा अत्रे यांची भावना

यामध्ये, ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता श्रीकांत सवणे (बी.आर.टी.एस), ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय – शहर अभियंता मकरंद निकम, ‘क’ क्षेत्रिय कार्यालय – भूमी आणि जिंदगी सहायक आयुक्त प्रशांत जोशी, ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय – समाज विकास विभाग उपआयुक्त अजय चारठाणकर, ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता सतीश इंगळे, ‘फ’ क्षेत्रिय कार्यालय – प्र.अतिरिक्त आयुक्त (3) उल्हास जगताप, ‘ग’ क्षेत्रिय कार्यालय – उप आयुक्त तथा प्रभारी कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, ‘ह’ क्षेत्रिय कार्यालय – पर्यावरण विभाग सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात (Jansanvad Sabha) आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.