Pimpri Corona Update : शहरात आज 87 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड (Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील 87 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज(रविवारी) नोंद झाली. कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुगणाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरातील 3 लाख 69 हजार 844 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 485 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 471 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर, केवळ 14 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल (Pimpri Corona Update) आहे. आज दिवसभरात 1 हजार 254 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 37 लाख 44 हजार 622 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.