Jawa 42 Bobber : जावा येझ्दी मोटरसायकल्स नव्या, आकर्षक जावा 42 बॉबरच्या सहाय्याने फॅक्टरी कस्टम क्षेत्रातले आपले वर्चस्व आणखी बळकट करणार

एमपीसी न्यूज : वर्ष 2018 मध्ये जावा येझ्दी मोटरसायकलने (Jawa 42 Bobber) तीन नव्या जावा मॉडेल्ससह दमदार पुनरागमन केलं होतं आणि तेव्हा पेराकनं आपल्या अभूतपूर्व स्टायलिंगनं सगळ्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर वर्षभराने लाँच करण्यात आलेल्या जावा पेराकनं देशात फॅक्टरी कस्टम क्षेत्राची सुरुवात केली. लाँच झाल्यापासूनच जावा पेराक हिट ठरली आणि तिनं स्वतःचा वेगळा ग्राहकवर्ग तयार केला. इतकंच नव्हे, तर ग्राहकांना जावापासून कस्टम मोटरसायकल मिळवण्याचा पर्याय तसंच ती फॅक्टरी बिल्ट असण्याची खात्री मिळाली.

त्यानंतर थेट आजच्या दिवशी जावा येझ्दी मोटरसायकलच्या श्रेणीत आणखी एक फॅक्टरी कस्टम मोटरसायकल समाविष्ट होत आहे. जावा 42 फॅक्टरी कस्टम करून नव्या जावा ४२ बॉबरच्या रूपात दिसणार आहे. भारतातील बॉबर आणि फॅक्टरी कस्टमची संस्कृती नव्या उंचीवर नेण्यासाठी ही नवी मोटरसायकल मिस्टिक कॉपर, मूनस्टोन व्हाइट आणि ड्युएल टोन जेस्पर रेड अशा तीन चमकदार रंगांमध्ये उपलब्ध करण्यात येईल. डिझाइन आणि स्टायलिंगबरोबरच नव्या 42 बॉबरमध्ये अर्गोनॉमिक्स आणि आधुनिक सुविधा देऊन फॅक्टरी कस्टमचा अनुभव आणखी सरस करण्यात आला आहे.

 

नव्या मोटरसायकलची किंमत 2, 06, 500 रुपयांपासून, एक्स शोरूम दिल्ली असून ती पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीपासून देशभरातील जावा येझ्दी मोटरसायकलच्या वितरकांकडे उपलब्ध करण्यात येईल.

नव्या मोटरसायकलविषयी क्लासिक लेजंड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग म्हणाले, नवी 42 बॉबर ही आमच्यासाठी वेगवेगळ्या यशस्वी उत्पादनांचा मिलाफ साधणारी आहे. जावा 42 ही गाडी आधुनिक रेट्रो मोटरसायकलचं नवं रूप मांडणारी होती आणि ती तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. किंबहुना ती आमच्या सर्वाधिक विक्रीच्या मॉडेल्सपैकी एक ठरली. पेराकसह आम्ही देशात फॅक्टरी कस्टम’ क्षेत्राची सुरुवात केली आणि तिची लोकप्रियता व चाहतावर्ग लपून राहिलेला नाही. नव्या 42 बॉबरमध्ये (Jawa 42 Bobber) दोन्हीकडच्या वैशिष्ट्यांचा मेळ घालण्यात आला आहे. बॉबरची कामगिरी व तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि 42 ची तरुण, दमदार रूप असा संगम नव्या गाडीत पाहायला मिळेल. या गाडीच्या माध्यमातून आम्ही वैशिष्ट्यपूर्ण, स्टायलिश आणि अनोख्या मोटरसायकलच्या शोधात असलेल्या रायडर्सच्या वर्गापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

पेराकचं व्यक्तिमत्त्व वर्चस्व गाजवणारं होतं, तर नवी ४२ बॉबर आकर्षक आहे. नवी मोटरसायकल बॉबरची देखणी स्टाइल, गरजेपुरतं बॉडीवर्क, चॉप्ड फेंडर्स, लो सिंगल सीट आणि जाडजूड टायर्स यांना एकनिष्ठ राहाणारी आहे, पण त्याचबरोबर तिला लक्षवेधक रंग आणि उठावदारपणा देण्यात आला आहे.

जावा 42 बॉबरचे (Jawa 42 Bobber) नवे स्टायलिंग लक्ष वेधून घेणारे आहेच, शिवाय ते कार्यक्षम आणि बॉबरच्या प्रसिद्ध साधेपणाला साजेसे आहे. त्यात पुढच्या बाजूस नवे गोलाकार हेडलॅम्प्स, स्वतंत्र क्लॉक कन्सोल, इंधनाची नवी टाकी आणि पूर्णपणे नव्याने डिझाइन करण्यात आलेली सीट यांचा समावेश आहे.

इंधनाची नवी टाकी योग्य रचना – कार्व्ड नी रिसेसेससह बसवण्यात आली असून तिचे टँक पॅड्स आधुनिक- रेट्रो लूक दर्शवणारे तसेच रायडिंगवेळेस आवश्यक पकड देणारे आहेत. फेंडर्स आणि साइड पॅनेल्सना चमकदार काळ्या रंगाचे फिनिशिंग दिल्यामुळे ते अजून उठून दिसतात.

स्वतंत्र क्लॉक कन्सोल आणि सुबकपणे बसवण्यात आलेले हेडलॅम्प्स युनिट 42 पासून प्रेरणा घेऊन तसेच फ्रंटएंड लूक राकट दिसावा या हेतूने बनवण्यात आले आहेत. डिजिटल क्लॉक कन्सोल आणि कॉन्ट्रास्टिंग एलसीडी स्क्रीन महत्त्वाची सर्व माहिती देणारे आणि सॅडलपासून चांगली दृश्यमानता देणारी आहे. एकंदर लायटिंग एलईडी असून या सुविधा हाताळण्यासाठी मोटरसायकलला नवे स्विचगियर्स देण्यात आले आहेत.

फ्लोटिंग सीट हे पूर्णपणे नवे युनिट असून त्याचे सीट पॅन, कुशनिंग आणि अपहोल्स्ट्री नव्याने तयार करण्यात आले आहे. नवी सीट 42 बॉबरच्या सुधारित अर्गोनॉमिक्सचा बेस तयार करणारी आहे. रायडरच्या पसंती उतरले आणि मुख्य म्हणजे त्याच्यासाठी सोयीस्कर, आरामदायी व वैविध्यपूर्ण ठरेल या हेतूने सीट तयार करण्यासाठी बरीच मेहनत घेण्यात आली आहे. नवे हँडलबार, नवे फॉर्वर्ड फुट कंट्रोल्स (फुट पेग्ज आणि लिव्हर्स) आणि सीट यातून नवा त्रिकोण तयार झाला आहे, तर सीटवर २ स्तरीय अडजस्टेबल सुविधेमुळे रायडरला त्याच्या पसंतीनुसार सीट पुढे- मागे करता येते. त्यातून जास्त आरामदायी रायडिंग पोश्चर तयार झाले असून त्यामुळे रायडिंग करताना जास्त मजा येते आणि बॉबर त्यासाठीच तर आहे.

रायडिंगचा धमाल अनुभव देण्याचा पेराकचा वारसा ४२ बॉबरनेही जपला असून त्यामध्ये ३३४ सीसी इंजिन बसवण्यात आले आहे, जे ३०.६४ पीएस पॉवर आणि ३२.७४ एनएम टॉर्क देते. त्याला ६ स्पीड ट्रान्समिशनची जोड देण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण रेव रेंजमध्ये चांगला कामगिरी मिळते. शहरातला प्रवास असो किंवा खुल्या हायवेवरची भटकंती, 42 बॉबर आपल्या रायडर्सना भरपूर आनंद देईल याची काळजी घेण्यात आली आहे. याची चासीस अजून परिणामकारक करण्यात आली असून सस्पेन्शन आणि रिकॅलिब्रेटेड ब्रेक्समुळे मोटरसायकल जास्त शार्प झाली आहे. 42 बॉबरमध्ये सर्वोत्तम कॉन्टिनेंटल ड्युएल चॅनेल एबीएस ब्रेक्स देण्यात आले आहेत.

परिणामी या मोटरसायकलसाठी तयार करण्यात आलेलं मिंडर ब्रँड कॅम्पेन 42 बॉबरचं व्यक्तिमत्त्व मांडण्यासाठी साजेसं आहे. मिंडर या शब्दाला भौगोलिक बाजू असली आणि त्याचा अर्थ कोणत्याही निश्चित योजनेशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमंती करणे असा असला, तरी हा शब्द मनाच्या बाबतीतही मांडला जातो. जिथे मन रायडिंग करताना सातत्यानं एका विचारावरून दुसरीकडे फिरत राहातं. लहर आली की फिरतं, स्वप्नाच्या मागे फिरतं किंवा फक्त रायडिंग करायचं म्हणून फिरतं – 42 बॉबर ही मोटरसायकलही  तुमच्या मनाला आनंद होईल तेव्हा फिरण्यासाठीच बनवण्यात आली आहे.

MPC News Quiz 8: ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा – भगवती ज्वेलर्सच्या वतीने बक्षिसांचा डबल धमाका! जिंका तब्बल चांदीचे 18 करंडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.