MPC News Online Bappa : ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाइन बाप्पा स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका चांदीची 25 नाणी!

एमपीसी न्यूज : सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आज होत आहे. बाप्पाला घरी आणण्यासाठी सर्वांची लगबग सुरु आहे. (MPC News Online Bappa) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांत पहिले ‘एमपीसी न्यूज‘ पोर्टल यावर्षीही ‘ऑनलाइन बाप्पा‘ ही संकल्पना राबवत आहे. आपल्या घरचा, गृहनिर्माण सोसायटीचा गणपती ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याची त्याचबरोबर 25 विजेत्या स्पर्धकांना चांदीची नाणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.

Delhi News : पंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक निर्णय! महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर

नामवंत सुवर्णपेढी केडी सोनिगरा ज्वेलर्स, भांबुर्डेकर सराफ ज्वेलर्स आणि दिलीप सोनिगरा ज्वेलर्स हे या स्पर्धेचे प्रायोजक असून त्यांच्या वतीने 25 विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देण्यात येणार आहे.

घराघरांत आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव‘. प्रत्येक घरी विशिष्ट विषयांवर आधारित आकर्षक सजावट केली जाते. बाप्पापुढे केल्या जाणा-या सजावटीमधून समाजात चांगला विचार पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. (MPC News Online Bappa) याच प्रयत्नांना ‘एमपीसी न्यूज‘ बळ देणार आहे. प्रत्येकाच्या घरातील बाप्पा ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून संपूर्ण जगभर दाखवले जाणार आहेत.

आपल्या घरातील, गृहनिर्माण सोसायटीतील अथवा आपल्या कार्यालयातील बाप्पांचा, गणेशोत्सवातील सजावटीचा फोटो, आपले नाव आणि पत्यासह mpcnews.in या आमच्या अग्रगण्य मराठी वेब पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्याचबरोबर या उपक्रमात सहभागी होणाऱ्या 25 स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देखील देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे नियम व अटी

1) या स्पर्धेत पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवाशीच सहभागी होऊ शकतात.

2) एक स्पर्धक त्यांच्या बाप्पांचे जास्तीत जास्त पाच फोटो अपलोड करू शकतात.

3) कोणत्याही फोटोचा फाईल साइज दहा एमबी पेक्षा जास्त असू नये.

4) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

5) पुणे व पिंपरी-चिंचवड परिसराच्या बाहेरील गणेश भक्त देखील त्यांच्या बाप्पांचे फोटो पाठवू शकतील, ते प्रसिद्ध देखील केले जातील, मात्र पारितोषिकासाठी ते अपात्र राहतील.

6) स्पर्धेचा निकाल 30 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केला जाईल.

7) स्पर्धेतील विजेत्यांना प्रायोजक सुवर्णपेढीत प्रमाणपत्र व चांदीचे नाणे प्रदान करण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरून आपल्या लाडक्या बाप्पांचे फोटो अपलोड करावेत.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfk8f5XYJciJtqG5m9-lOjOeKXKfXheS3Km1p1Sw7isLU3bmw/viewform?usp=sf_link

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.