Junnar: पुणे, मुंबईतून आलेल्या 19000 लोकांना ठेवणार ‘होम क्वारंटाईन’मध्ये

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या भितीने पुणे, मुंबई येथून आपल्या मूळगावी वास्तव्यासाठी आलेल्या जुन्नरमधील 19 हजार नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात येणार आहे. पुणे, मुंबईतून गावी आलेल्या सरसकट सर्व नागरिकांना क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले आहेत.

ओझर,लेण्याद्री देवस्थानचे भक्तभवन,नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र, बेल्हे येथील समर्थ कॉलेजच्या हॉस्टेल अशा विविध ठिकानी लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जे लोक 14 दिवसापूर्वी तालुक्यात आले आहेत त्यांना या आदेशातून वगळण्यात येणार आहे.

जुन्नर तालुक्यात पुणे आणि मुंबई येथून जवळपास 19 हजार लोक आले आहेत. यातील नागरिक कोरोना बाधीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बाहेरून येणा-या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांद्वारे हे सर्वेक्षण सुरू आहे. तालुक्यात आतापर्यंत बाहेरून 19 हजार लोक आले आहेत. त्यांना घरातच क्वॉरंटाईन होण्याच्या सुचना दिल्या असल्याचे तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.