Kalewadi : फूटपाथवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे हटवा; ‘रिदम’ची मागणी

एमपीसी न्यूज – काळेवाडी फाटा ते कावेरीनगर भुयारी मार्ग (Kalewadi) दरम्यानच्या परिसरातील फूटपाथवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवावीत. फूटपाथ IRC मानकांशी सुसंगत बनवावेत. पायी जाण्यासाठी पुरेशी जागा मिळेल अशा पद्धतीने पदपथाची रुंदी आणि उची अशी असावी. काळेवाडी फाटा ते कावेरीनगर भुयारी मार्ग मधील सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधा स्वच्छ ठेवाव्यात, अशी मागणी रिदम गृहनिर्माण सोसायटीने महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, काळेवाडी फाटा आणि कावेरीनगर भुयारी मार्गावर फुटपाथ आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. फुटपाथवर अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणे झाली आहेत. पायी जाणाऱ्यांना सेवा रस्त्यावरून जावे लागते.

पादचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काळेवाडी फाट्याच्या मुख्य कोपऱ्यावरील पदपथावर मासळी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. रिक्षा उभ्या राहिल्याने अर्धा रस्ता अडतो. परिणामी, वाहतूक कोंडी होते. त्यामुळे BRT मधून बाहेर पडण्याचा मार्ग देखील बेकायदेशीरपणे व्यापला जातो. त्यामुळे रस्त्यावरून चालणे अशक्य होते. सुरक्षिततेला धोका निर्माण होतो.

काळेवाडी फाटा आणि रिदम सोसायटी दरम्यान काही गॅरेजची दुकाने आहेत. संपूर्ण फुटपाथ आणि उड्डाणपुलाच्या खाली बहुतांश जागेवर गॅरेजचालक आणि वाहनांनी अतिक्रमण केले आहे. रिदम सोसायटीच्या गेटजवळील वाईन शॉप्सना आवारात व्यवसाय करण्याचा परवाना आहे.

Pimpri : मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीहल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

परंतु, फूटपाथवर पूर्णपणे ग्राहकांनी अतिक्रमण केले आहे. ग्राहक रिकाम्या बाटल्या आमच्या गेटसमोर ठेवत आहेत. काही (Kalewadi) ग्राहक फुटपाथची जागा पार्किंग, मद्यपान आणि काही वेळा लघवीसाठी वापरत आहेत. त्यामुळे दिवसा फिरणे ही असुरक्षित बनले आहे.

या मार्गावरील बहुतेक फुटपाथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेवर दुकानमालकानी किंवा रस्त्यावरील विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी, पादचारी, सायकलस्वार, लहान मुले यांना रस्त्यावरून चालताना असुरक्षित वाटते.

महापालिकेच्या नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट पॉलिसीमध्ये पादचारी पायाभूत सुविधा वाढवण्याचे धोरण केले आहे. ज्यामुळे नागरिकाना सुरक्षितपणे आणि सहजरित्या जवळच्या भागात प्रवेश करता येईल. फुटपाथची स्थिती धोरणात व्यक्त केलेल्या movement of people, not vehicle या ध्येयाच्या विरुद्ध आहे.

महानगरपालिका फूटपाथच्या नूतनीकरणावर कोट्यवधींचा खर्च करत आहे. परंतु, फुटपाथवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण राहिले तर पैसे खर्च करून काय उपयोग नाही. त्यामुळे महापालिकेने अगोदर फुटपाथवरील अतिक्रमणे, बांधकामे यावर कारवाई करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.