Kalyani Group : कल्याणी ग्रुपचा भारतात ग्रीन स्टील निर्मितीमध्ये पुढाकार

एमपीसी न्यूज : कल्याणी ग्रुपमधील एक कंपनीसारलोहा ऍडवान्स्ड मटेरियल्स प्रायव्हेट लिमिटेडने (सारलोहा) “कल्याणी फेरेस्टा” या ब्रँडअंतर्गतभारतातील अशाप्रकारचे पहिले हरित स्टील आज लॉन्च केले.  याप्रसंगी स्टील आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे ज्योतिरादित्य सिंदिया उपस्थित होते. सारलोहा हे मेड इन इंडिया ग्रीन स्टीलचे पहिले पुरवठादार बनले आहेत.(Kalyani Group) हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे सारलोहा 2030 सालापर्यंत कार्बन उत्सर्जन 2005 मधील स्तराच्या तुलनेत 45% नी कमी करण्याच्या आणि 2070 सालापर्यंत नेट झीरो एमिशन असलेला देश बनण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेमध्ये योगदान देण्यात सक्षम बनेल.

“कल्याणी फेरेस्टा” स्टील उत्पादने 100% नूतनीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळवण्यात आलेली वीज वापरून इलेक्ट्रिक आर्क फर्नेसमध्ये आणि 70% पेक्षा जास्त रिसायकल करण्यात आलेले भंगार साहित्य वापरून तयार केली जातात.  या उत्पादन प्रक्रियेचा जीएचजी फूटप्रिंट शून्य आहे. कल्याणी फेरेस्टा प्लसचे क्रूड स्टीलच्या प्रत्येक टनामागे होणारे जीएचजी उत्सर्जन नेट शून्य असतेतर कल्याणी फेरेस्टाचे क्रूड स्टीलच्या प्रत्येक मेट्रिक टनामागे जीएचजी उत्सर्जन खूप कमी <0.19 tCO2इतके असते. कल्याणी फेरेस्टा आणि कल्याणी फेरेस्टा प्लस स्टील उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ग्रीन स्टील सर्टिफिकेट्स मिळतील जी डीएनव्ही बिझनेस अश्युरन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सारलोहा यांनी संयुक्तपणे जारी केलेली असतील. या सर्टिफिकेट्सचा वापर ते त्यांच्या स्कोप 3 एमिशन्समध्ये घट दावा करण्यासाठी वापरू शकतील.

मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी या लॉन्च प्रसंगी सांगितले, “आज भारताच्या स्टील उद्योग क्षेत्रात नवा सुवर्णदिन उगवला आहे, भारताने नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर करून (Kalyani Group) हरित स्टील उत्पादनास सुरुवात केली आहे.  कल्याणी फेरेस्टा स्पेशालिटी स्टील प्लांट जवळपास नेट शून्य कार्बन उत्सर्जनासह पर्यावरणानुकूल पद्धतीने स्टील उत्पादनाच्या दिशेने नवे मार्ग खुले करून देईल.

Pune News : बँकॉकमधून सोन्याच्या पेस्टची तस्करी करणाऱ्या महिलेला पुणे विमानतळावरून घेतले ताब्यात

राष्ट्राच्या विकासात स्टील क्षेत्र ही एक पायाभूत शक्ती आहे. भरपूर कार्बन उत्सर्जन करणाऱ्याकार्बन उत्सर्जन कमी करणे ज्याठिकाणी खूप कठीण आहे असे क्षेत्र ही स्टील उद्योगाची दीर्घ काळापासूनची ओळख कमी कार्बन उत्सर्जनासह हरित स्टील उत्पादन करणाऱ्या क्षेत्रामध्ये बदलण्यात हा उपक्रम मदत करेल. 2070 सालापर्यंत नेट झीरो देश बनण्याचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचे व्हिजन साकार करण्यात देखील याचे खूप मोठे योगदान असणार आहे.

हे क्रांतिकारी पाऊल उचलल्याबद्दल मी कल्याणी ग्रुपला शुभेच्छा देतो आणि आशा व्यक्त करतो कीसामाजिक जबाबदारीचे भान राखून वाटचाल करणाऱ्या व्यवसायांसाठी हे मार्गदर्शक बनेल.”

भारत फोर्जचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर अमित कल्याणी यांनी सांगितले, “आपण स्थिर विकासाच्या युगामध्ये प्रवेश करत आहोत. कल्याणी ग्रुपमध्ये आम्ही आमचे कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि कल्याणी फेरेस्टा हे कार्बन तटस्थता साध्य करण्याचे व्यापक व्हिजन (Kalyani Group) प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले लक्षणीय पाऊल आहे. ग्रीन स्टील हे जागतिक अर्थव्यवस्थेचे भवितव्य आहे आणि भारतातील नूतनीकरणीय ऊर्जेची विशाल क्षमता पाहता आम्ही यामध्ये पुढाकार घेऊन नेतृत्व करू शकतो याची आम्हाला खात्री आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.