CSK Ice Squash Trophy : कमलेश ढमढोरे, आर्यमन सिंग, गार्गी कदम, लक्ष्मी लछका, व्ह्योमिका खंडेलवाल, क्रिया सरवानन यांचे संघर्षपूर्ण विजय

एमपीसी न्यूज – आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ 2022 खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेच्या (CSK Ice Squash Trophy)  विविध गटामध्ये महाराष्ट्राच्या कमलेश ढमढोरे, आर्यमन सिंग, गार्गी कदम, लक्ष्मी लछका, व्ह्योमिका खंडेलवाल आणि तामिळनाडूच्या क्रिया सरवानन या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धीं विरूध्द संघर्षपूर्ण विजयांची नोंद करून आगेकूच केली.

 

मुंढवा येथील चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या 13 वर्षाखालील गटामध्ये खोपोली, महाराष्ट्र येथील कमलेश ढमढोरे याने दिल्लीच्या व पाचव्या मानांकित स्वरील पाटील याचा 9 – 11, 11 – 8, 11 – 6, 8 – 11, 11 – 8 असा सनसनाटी पराभव केला. याच गटात आर्यमन सिंग याने आदित्य घोडके याचा 12 – 14, 12 – 10, 12 – 10, 13 – 15, 11 – 4 असा पराभव केला.

Eknath Shinde Press Conference: फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला – एकनाथ शिंदे

 

 

 

11 वर्षाखालील गटामध्ये गार्गी कदम हिने महिका सुब्रमण्यम हिचा 7 – 11, 11 – 3, 11 – 5, 11 – 7 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. 13 वर्षाखालील मुलींच्या गटात लक्ष्मी लछका हिने आएशा खानयारी हिचा 6 – 11, 11 – 8, 11 – 7, 11 – 5 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

महिला गटाच्या सामन्यात नवव्या मानांकित व्ह्योमिका खंडेलवाल हिला विजयासाठी झुंझावे लागले. व्ह्योमिकाने तामिळनाडूच्या अर्मिथा राजलक्ष्मी हिचा 11 – 9, 10 – 12, 13 – 11, 11- 8 असा पराभव केला. तामिळनाडूच्या क्रिया सरवानन हिने महाराष्ट्राच्या आणि पाचव्या मानांकित इशा श्रीवास्तवा हिचा 15 – 13, 11 – 6, 1- 11, 11 – 7 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला.

 

स्पर्धेचे संक्षिप्त निकालः पुरूष गटः तिसरी फेरी –

संदीप जांग्रा (हरयाणा) वि.वि. तीर्थ झिलका (महा, 9) 11 – 2, 11 – 4, 11 – 3;

अविनाश यादव (महा) वि.वि. अविनाश सहानी (महा, 10) 11 – 7, 11 – 6, 11 – 7;

आर्दश बोंधा (महा) वि.वि. रूद्रा लखानी (महा) 11 – 3, 11 – 9, 5 – 11, 11 – 5;

सौरभ कुमार (उत्तरप्रदेश) वि.वि. नरेश सिंगवा (महा) 11 – 3,  11 – 6, 11 – 1;

 

 

 

13 वर्षाखालील गटः दुसरी फेरी – 

हृधान शहा (महा, 1) वि.वि. ज्योएल दिनकरन (तामिळनाडू), 11 – 9,  11 – 3, 11 – 2;

 

कमलेश ढमढोरे (महा) वि.वि. स्वरील पाटील (दिल्ली, 5) 9 – 11, 11- 8, 11 – 6, 8 – 11, 11- 8;

 

अगस्त्य राजपुत (महा) वि.वि. आयान अलि (मध्य प्रदेश) 11 – 2, 11 – 5, 11 – 3;

 

अर्णव धारीया (महा) वि.वि. धु्रव केसर (केरळ) 9  – 11, 11 – 7, 11 – 2, 11 -4 ;

 

आर्यमन सिंग (महा) वि.वि. आदित्य घोडके (महा) 12 – 14,  12 – 10, 12 – 10, 13 – 15, 11- 4;

 

11 वर्षाखालील गटः पहिली फेरी –

निशा दरवाडा (महा) वि.वि. निरा सिंगवा (महा, 9) 11 – 1,  11 – 0, 11 -0;

 

फाबिया नाफिज (उत्तरप्रदेश) वि.वि. हेमलता दरवाडा (महा), 11 – 0, 11- 0, 11 – 1;

 

अरना दिवेदी (तेलंगणा) वि.वि. रूही लोढा (महा)  11 – 1, 11 – 2,  11 – 1;

 

गार्गी कदम (महा) वि.वि. महिका सुब्रमण्यम (महा) 7 – 11, 11 – 3, 11 – 5, 11 – 7;

 

त्रिशा शहा (महा) वि.वि. शहाना रॉय (महा) 11 – 4, 11 – 3,  11 – 6;

 

 

13 वर्षाखालील मुलीः पहिली फेरी –

सिया पंडीता (गोवा), वि.वि. धर्मी पारधी (महा) 11 – 4,  11 – 6,  12- 10;

 

लक्ष्मी लछका (महा) वि.वि. आएशा खानयारी (महा) 6 – 11, 11 – 8, 11 – 7, 11 – 5;

 

आशा निरगुडे (महा) वि.वि. आरवी रैना (महा) 11 – 2, 11 – 4, 11 – 6;

 

महिला गटः दुसरी फेरी –

 

सुनिता पटेल (महा, 1) वि.वि. सहाना कलाईवानान (तामिळनाडू) 11 – 2, 11 – 3, 11 – 5;

 

व्ह्योमिका खंडेलवाल (महा, 9) वि.वि. अर्मिथा राजलक्ष्मी (तामिळनाडू) 11 – 9, 10 – 12, 13 – 11, 11 -8;

 

छावी सरण (राजस्थान) वि.वि. रेविया निंबाळकर (महा) 11 – 2, 11 – 9, 9 – 11, 15 – 13;

 

दिपिका व्हि. (तामिळनाडू) वि.वि. अंबर कौर (पश्‍चिम बंगाल) 11 – 4, 11 – 4, 11 – 5;

 

क्रिया सरवानन (तामिळनाडू) वि.वि. इशा श्रीवास्तवा (महा, 5) 15 – 13, 11 – 6, 1- 11, 11 – 7;

 

नयना तनेजा (महा) वि.वि. आद्या बुधिया (झारखंड) 11 – 4,  15 – 13,  10 – 12, 11 – 3;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.