Kamshet : बाजारात गेलेले वयोवृद्ध घरी परतलेच नाहीत

'कामशेत'मध्ये पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नातेवाईकांची तक्रार

एमपीसी न्यूज – कामशेत येथे बाजारात जाण्याच्या निमित्ताने बाहेर पडलेले 80 वर्षांचे आजोबा घरी परतलेच नाहीत. याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी कामशेत पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी (दि. 23 फेब्रुवारी) घडली.

मारुती वामन साळवे (वय 80, रा. चिखलसे, ता. मावळ, पुणे) असे बेपत्ता वृद्ध आजोबांचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र मारुती साळवे (वय 49) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मारुती साळवे रविवारी दुपारी बाराच्या सुमारास कामशेत येथील बाजारात जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडले. दिवसभर ते घरी परतले नाहीत. रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी येतील, असा घरच्यांना विश्वास असल्याने त्यांनी तोपर्यंत वाट पाहिली. मात्र, साळवे घरी परतलेच नाहीत. रविवारी रात्रीपासून घरच्यांनी त्यांचा नातेवाईक, बाजार, आसपासची गावे आणि परिसरात त्यांचा शोध सुरू केला.

बुधवारी (दि. 26) याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. रंग सावळा, उंची 5 फूट 6 इंच, केस पांढरे विरळ, चेहरा गोल, नाक मोठे, पांढरी दाढी, मराठी, हिंदी भाषा बोलता येतात. अंगात पांढरा कुर्ता आणि धोतर घातलेले आहे. मारुती साळवे यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास महेंद्र मारुती साळवे (9881012230 / 9325224112) यांच्याशी संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.