Kamshet : सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ तालुका सहसंपर्क प्रमुखपदी किरण ढोरे

एमपीसी न्यूज- सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या मावळ तालुका सहसंपर्क प्रमुखपदी युवा नेते किरण ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली. रविवार (दि.१८) कामशेत येथील गणेश मंगल कार्यालय येथे सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने गणेशमूर्ती रंगकाम आणि अकादमीच्या पदवाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये मावळ तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी अंकुश काटकर, तळेगाव दाभाडे विभाग प्रमुखपदी सागर गवारे, वडगाव विभाग प्रमुखपदी रुपाली तापकर आणि मावळ तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निलेश गोडे यांची निवड करण्यात आली. सदर नियुक्ती अकादमीचे मावळ तालुका संपर्क प्रमुख चेतन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

अकादमीच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रशिक्षण शिबिराचा दुसरा टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांनी घडविलेल्या मूर्तीचे रंगकाम करण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तळेगाव दाभाडेचे युवा नेते अक्षय ढोरे यांनाही यावेळी अकादमीच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भेगडे, सभापती संतोष कुंभार, पोलीस निरीक्षक कामशेत विठ्ठल दबडे, लायन्स क्लब अध्यक्ष प्रतापराव गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य कामशेत गजानन शिंदे, शालेय शिक्षक अतिश थोरात आणि सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी तर आभार प्रदर्शन चेतन वाघमारे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.