Talegaon Dabhade : मावळ तालुका 55 किलो शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये तन्मय शेलार प्रथम

एमपीसी न्यूज- जिल्हा क्रीडा परिषद द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी व नामदार बाळा भेगडे स्नेह ग्रुप आयोजित मावळ तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत बालविकास शाळेचा विद्यार्थी तन्मय प्रताप शेलार हा 17 वर्षाखालील 55, किलो वजन गटात प्रथम आला आहे.

ही स्पर्धा रविवारी (दि. 17) सोमाटणे येथील गुरुकुल कुस्ती संकुल येथे पार पडल्या. तन्मय शेलार हा गुरुकुल कुस्ती संकुल सोमाटणे येथे वस्ताद शंकर कंधारे व मावळ केसरी खंडूभाऊ वाळुंज यांचे मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करीत आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.