Kasaba Result : तब्बल 53 टक्के मते मिळवत धंगेकर यांनी नोंदविला निर्विवाद विजय

एमपीसी न्यूज – कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Kasaba Result) महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत इतिहास घडवला. 11 हजार 040 एवढ्या मताधिक्याने त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली.

भाजप विरोधी मतांचे ध्रुवीकरण हे धंगेकर यांच्या यशाचे गणित म्हणावं लागेल. झालेल्या मतदानापैकी तब्बल 52.98 म्हणजेच 53 टक्के मते आपल्याकडे खेचण्यात धंगेकर यशस्वी ठरल्याचं पहायला मिळत आहे.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना देखील 45.09 टक्के मते मिळाली आहे, मात्र निवडणूक रिंगणातील दोन प्रमुख उमेदवार वगळता उर्वरित 14 उमेदवारांना खूपच नगण्य म्हणजे 0.93 टक्के मते मिळाल्याने मतविभागणी झाली नाही. त्याचा मोठा फटका रासने यांना बसला.

रासने यांच्या विरोधातील बहुतांश मते थेट धंगेकर यांना मिळाल्याने त्यांच्या मतांच्या टक्केवारी 53 पर्यंत (Kasaba Result) वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

एकूण मतदारांपैकी एक टक्का म्हणजे 1401 मतदारांनी नोटा या पर्यायापुढील बटन दाबून सर्व उमेदवारांविषयी नापसंती व्यक्त केली आहे. दोन प्रमुख उमेदवार वगळता 14 उमेदवारांना मिळून एक टक्का मते देखील मिळवता आलेली नाहीत.

Kasaba Result : अभिजित बिचुकले आणि आनंद दवे यांना किती मते मिळाली?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.