Kasaba Result : अभिजित बिचुकले आणि आनंद दवे यांना किती मते मिळाली?

एमपीसी न्यूज – विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत राहणारी (Kasaba Result) दोन व्यक्तिमत्त्वे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. विविध निवडणुकांचा प्रदीर्घ अनुभव असलेले अभिजित बिचुकले आणि ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे या उमेदवारांबाबत अनेकांना उत्सुकता होती. जाणून घेऊयात…या दोन उमेदवारांना किती मते मिळाली?

अभिजित बिचुकले यांना तीन आकडी मते तर सोडाच पण साधं मतांचं अर्धशतक पण पूर्ण करता आलेलं नाही. बिचुकले यांच्या झोळीत मतदारांनी केवळ 47 मतं टाकली आहे.

भाजपने ब्राह्मण उमेदवार न दिल्याचा निषेध करीत ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना मतांचं त्रिशतक देखील गाठता आलं नाही. त्यांना (Kasaba Result) केवळ 296 मतांवर समाधान मानावं लागलं आहे.

IND VS AUS : दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी पत्करली शरणागती

अ. क्र.उमेदवाराचे नावपक्षाचे नावमिळालेली मतेटक्केवारी
1रवींद्र धंगेकरकाँग्रेस73,30952.98
2हेमंत रासनेभाजप62,39445.09
3तुकाराम डफळसैनिक समाज पार्टी1530.11
4बलजितसिंग कोचरप्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी510.04
5रवींद्र वेदपाठकराष्ट्रीय मराठा पार्टी410.03
6अनिल हातागळेअपक्ष1080.08
7अभिजित बिचुकलेअपक्ष470.03
8अमोल तुजारेअपक्ष310.02
9आनंद दवेअपक्ष2970.21
10अजित इंगळेअपक्ष260.02
11सुरेश ओसवालअपक्ष630.05
12खिसल जलाल जाफरीअपक्ष490.04
13चंद्रकांत मोटेअपक्ष390.03
14रियाज सय्यदअपक्ष620.04
15संतोष चौधरीअपक्ष720.05
16हुसेन शेखअपक्ष2380.17
17नोटा14011.01
एकूण1,38,381100

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.