Kasarasai : गाडीचा आरसा लागला म्हणून दुचाकी स्वराला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज-  गाडीचा आरसा लागला म्हणून दुचाकी स्वाराला एका कुटुंबाने कविता व दगडाने ( Kasarasai ) मारहाण केली आहे . ही घटना मंगळवारी कासारसाई येथे घडली.

या प्रकरणी अंबर रामचंद्र थोरवे ( वय  53 रा. कासारसाई ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी लक्ष्मण थोरवे, महिला आरोपी व थोरवे यांच्या दोन मुली सर्व राहणार कासारसाई यांच्याविरुद्ध पुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : इन्फिनिटी 90.4 एफएम कम्युनिटी रेडिओची राष्ट्रस्तरीय पुरस्कारासाठी निवड

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी व  त्यांचा मुलगा हे घरी जात असताना लक्ष्मण थोरवे यांच्या गाडीला फिर्यादीच्या मुलाच्या गाडीचा आरसा लागला. याचा राग येऊन आरोपीने व त्यांच्या मुलाला धरून ठेवले तर तिच्या मुलांनी मारामारी करण्यास सुरुवात केली.

तसेच आरोपी व त्याच्या पत्नीने फिर्यादी यांना पाठीत हाताने मारत जखमी केले . तसेच फिर्यादी व त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Kasarasai ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.