Kasarwadi: डॉ.अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीची नीट परिक्षेची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज –  रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, आनंद हॉस्पिटल, (Kasarwadi)भोसरी, शिवनेरी हॉस्पिटल, भोसरी व वाचनवेल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीचा नीट वैद्यकीय प्रवेश परिक्षा (NEET) हॉटेल कलासागर कासारवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष रो.ज्ञानेश्वर विधाते,सचिव रो.दिपक सोनवणे, मेडीकल प्रोजेक्ट डायरेक्टर व आनंद हॉस्पिटल भोसरीचे संचालक डॉ संतोष मोरे, शिवनेरी हॉस्पिटल भोसरीचे संचालक डॉ.योगेश‌ गाडेकर,वाचनवेल प्रतिष्ठान च्या रुपाली सोनवणे,रोटरी पर्यावरण संचालक आण्णासाहेब मटाले,साक्षरता संचालक प्रा.सचिन पवार,सी‌.एस आर.संचालक रो.दत्तात्रय कोल्हे,रो.दिपा दांगट यांच्या सह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

PCMC : अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई,  क्षेत्रीय कार्यालयातंर्गत कारवाईची मोहिम

यावेळी डॉ.अभंग प्रभू यांच्या सहज सोप्या भाषेतील मेडिकल (Kasarwadi)करिअरच्या ध्येय निश्चितीसाठी काय करावे ,पूर्वपरिक्षा, प्रवेशासाठी असणारे विविध पर्याय व संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीचे सहसंचालक प्रा.सचिन हळदवणेकर, डॉ.हिमानी तपस्वी,प्रा.युगंधरा मोरे, डॉ.शितल श्रीगिरी आणि प्रा तेजस शाह यांनी विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या मेडिकल करिअरबद्दलच्या शंकांचे निरसन केले.

पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ संतोष मोरे यांनी तर रोटरी क्लब चे सामाजिक योगदान अध्यक्ष रो.ज्ञानेश्वर विधाते यांनी विशद केले तर आभार रो.डॉ.योगेश गाडेकर यांनी मानले. रो.प्रा.दिपा दांगट यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.ऋतुजा उचाळे,आनंद हॉस्पिटल स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.