Kasarwadi News :  कॉलेजला निघालेल्या मुलीचे अपहरण  

एमपीसी न्यूज – कॉलेजला गेलेल्या 17 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात दिली आहे. विकास नगर, कासारवाडी येथे गुरूवारी (दि.07) ही घटना घडली.

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सायन संजीत सरकार या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी कॉलेजला जाते म्हणून गुरूवारी घरातून बाहेर गेली. तिला फोन करून विचारले असता तिने सायन सरकार याच्या सोबत असल्याचे सांगितले. आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीचे अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.