Crime News : कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्य़ा कथीत भाईला बेड्या  

एमपीसी न्यूज मैं इस एरीया का भाई हूं म्हणत एका 18 वर्षीय तरुणाला त्याची गाडी अडवून कोयत्याचा धाक दाखवून भरदिवसा लुटण्यात आले आहे.(Crime News) हा प्रकार कासारवाडी येथील जामा मश्जिद रोडवर सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.

भोसरी पोलिसांनी या प्रकऱणी शकिल कासम शेख (वय 25 रा. कासारवाडी) याला अटक केली आहे. याप्रकरणीँ भोसरी पोलीस ठाण्यात पियुष वासुदेव जाधवाणी (वय 18 रा. पिंपरी) याने फिर्याद दिली होती.

Pune News : काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवर प्रवास करणाऱ्या 8 वर्षाच्या रावी कौरचे आयएएसतर्फे स्वागत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्यांची गाडी अडवून गाडीची चावी काढून घेतली. तसेच शिवीगाळ करत पैशांची मागणी केली. यावेली फिर्यादी यांनी कसले पैसे मी देणार नाही असे सांगितले व मदतीसाठी त्यांच्या भावाला बोलावले. (Crime News) भाऊ तेथे आला असता आरोपीने दोघांना उद्देशून बोलला की, मी या एरीयातला भाई आहे, मला पैसे द्यावेच लागतील, पैसे नाही दिले तर जिवे मारून टाकीन अशी धमकी देत त्याने कबंरेचा कोयता काढून धाक दाखवण्यास सुरुवात केली यावेळी फिर्यादी यांनी इतर नागरिकांना मदतीसाठी बोलावले असता आरोपीने कोयत्याचा धाक दाखवून त्यांनाही जवळ येऊ दिले नाही.

आरोपीने शेवटी फिर्यादी  यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेत त्यातील हजार रुपये काढून घेतले व तो पसार झाला. याप्रकऱणी गुन्हा दाखल होताच भोसरी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.