Pune News : काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवर प्रवास करणाऱ्या 8 वर्षाच्या रावी कौरचे आयएएसतर्फे स्वागत

एमपीसी न्यूज – भारतामध्ये आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात (Pune News) उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इंडो ऍथलेटिक सोसायटी या संस्थेने काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवर प्रवास करणाऱ्या आठ वर्षाचा रावी कौर बदेशा या चिमुकलीचे पुणे शहरात स्वागत केले.

इंडो ऍथलेटिक सोसायटीच्या कार्यालयात तिची राहण्याची व भोजन व्यवस्था केली. रावी कौर हिचे वय फक्त 8 वर्षे आहे. मूळची पंजाब येथील असलेली रावी ही सद्य काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग मोहिमेवर आहे. सोबत तिचे वडील आणि काका आहेत. रविवारी सायंकाळी तिचे स्वागत समारंभ व मुलाखत आयोजित केली होती. यावेळी आयएएस सदस्य गणेश भुजबळ, गजानन खैरे, अजित पाटील, श्रेयस पाटील, मदन शिंदे, श्रीराम पाटील, अनिश पाटील, प्रशांत तायडे आदी उपस्थित होते.

‘सेव्ह द गर्ल चाइल्ड’, ही थीम प्रत्येकजण उत्कटतेने बोलतो. परंतु, सुधारण्यासाठी फारसे काही करत नाही. रावी बदेशा, एक तरुण 8 वर्षांची मुलगी आणि सायकलिंग चॅम्पियनने काश्मीर ते कन्याकुमारी सायकलचे आव्हानात्मक आणि भयावह मिशन हाती घेऊन सर्व अडथळे पार केले आहेत.(Pune News) पटियाला जिल्ह्यातील ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ साठी आधीच एक आयकॉन असलेली, आता ती मुलींच्या समर्थनार्थ 4500 किलो मीटर अंतर कापून भारतभर प्रवास करणार  आहे. एक खरी प्रेरणा, असे आव्हान स्वीकारण्याची तिची ही पहिलीच वेळ नाही, या वर्षीच तिने शिमला ते मनाली ते नारकंडा, चितकुल, चांदरताल तलाव, काझा आणि लोसार मार्गे 800 किमीचे अंतर कापले.

Maval : रसिकांच्या डोळ्याचं पारणे फेडणारा सृजन नृत्य महोत्सव, नेत्रदीपक नृत्य अविष्कारांची मेजवानी

ही खरोखरच एक भव्य घटना आहे. कारण, ती इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड अंतर्गत मान्यताप्राप्त एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करेल. तिच्यासोबत तिचे वडील सिमरनजीत सिंग आणि काका आहेत. जे पंजाब पोलिसात दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहेत. आजपर्यंत आम्ही हजारो देश विदेशातील सायकल किंवा धावणारे प्रवाशी यांना पुणे तसेच देशात विविध भागात मदत केली. पण, या चिमुकलीचे साहस पाहून खरंच आम्ही निशब्द झालो असे संस्थापक सदस्य गजानन खैरे म्हणाले.

निगडी ते बालेवाडी पर्यंत 50 किमी एकत्र सायकल चालवली आणि रावीला भावी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रोहित दिघे, सुनील चाको, अविनाश मेढेकर , (Pune News) प्रघुम्ना कुलकर्णी, रमेश माने, आनंदा पवार, रुषिकेश पोटे, दीपक बुरुक, निवेश घाडगे, दिनेश गुपचुप, निरंजन वेलणकर, आशिष कावरे, सतीश वारियर आणि संदीप परदेशी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.