Katraj Murder News: लाडक्या कुत्र्याचा गळा आवळल्याच्या रागातून मित्राचा खून करून मृतदेह घरातच पुरला

एमपीसी न्यूज – पुण्याच्या कात्रज परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. लाडक्या कुत्र्याचा गळा आवळल्याच्या रागातून मित्राने मित्राचा खून केला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह घरात पुरून तो पसार झाला. नंतर पूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून भारती विद्यापीठ पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत. 

किरण शिवाजी डोळे (वय 25) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी ओंकार झोरे पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की किरण डोळे आणि ओंकार चोरी हे दोन दिवसापूर्वी झोरेच्या घरी दारू पीत बसले होते. झोरे याला कुत्रे पाळण्याची आवड असून त्याच्या घरात एक कुत्रा आहे. त्या दिवशी त्याने दारूच्या नशेत एका कुत्र्याचा गळा आवळला. याचा राग आल्याने दोघांमध्ये भांडण झाले आणि रागाच्या भरात झोरे याने डोळे याचा खून केला. त्यानंतर मृतदेह घरातून पुरला आणि तो पसार झाला.

दुसऱ्या दिवशी त्याने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने भारती विद्यापीठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घरात पुरलेला मृतदेह बाहेर काढला. दरम्यान खून झाल्याची माहिती बसल्यानंतर कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली. भारती विद्यापीठ पोलीस सध्या या प्रकरणी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.